धुळे : दोन कुटुंबात झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आल्याची घटना धुळ्यात घडलीय.
साक्री पोलीस स्टेशनमध्ये हा वाद सुरु होता. यावेळी, पोलीस उपनिरीक्षक ढोले वाद मिटवण्यासाठी तिथं दाखल झाले.
घरगुती हिंसा प्रकरणातील आरोपींची जामिनावर मुक्तता केल्याचा राग मनात धरून मुलीकडच्या नातेवाईकांनी यावेळी ढोलेंनाच मारहाण केली. यात ढोले हे जबर जखमी झालेत. त्यांना चार टाकेही पडलेत.
मुंबईत ड्युटीवर असलेल्या विलास शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांचीच सुरक्षा कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.