नागपूर : नवी मुंबईतल्या दिघातल्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय. दिघातल्या अनधिकृत बांधकामे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश विधानपरीषदचे उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले.
दिघात कारवाईची टांगती तलवार असलेल्या २५,००० रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय. विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
त्यावर अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न हा फक्त दिघापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. सर्वांनी एकत्र येवून हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, असं सांगत सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी आणि न्यायालयात भूमिका मांडावी. तोपर्यंत ही कारवाई स्थगित ठेवावी, असा आदेश डावखरे यांनी दिला.
त्यानंतर सरकार या सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, दिघ्यातील रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारवाई करु नका, अशी मागणी केलेय.