सांगलीत अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

सांगलीत अवकाळी पाऊस झालाय. यामध्ये शेतकऱ्यांचंही बरंच नुकसान झालंय. 

Updated: Apr 1, 2017, 11:21 PM IST
सांगलीत अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका title=

सांगली : सांगलीत अवकाळी पाऊस झालाय. यामध्ये शेतकऱ्यांचंही बरंच नुकसान झालंय. 

तासगावच्या सावळजमध्ये जोरदार गारांचा पाऊस पडतोय. कवठेमहांकाळमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावलीय.

जोरदार वारे आणि पावसामुळे हिंगणगाव इथल्या एका शेतकऱ्याची द्राक्ष बाग जमीनदोस्त झालीय. सांगली जिल्ह्यातील सावळज, कवठेमहंकाळ, हिंगणगाव, तिसंगी, घाटनांद्रे, वाघोली, कुंडलापूर आणि गरजेपूर यांसारख्या अनेक गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झालंय. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत.