सुट्ट्या पैशांची चणचण : वाशी मार्केटमध्ये भाजीपाला पडून, भाज्यांचे दर घसरलेत

सुट्टे पैसे नसल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनी वाशीमधील घाऊक मार्केटकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ ग्राहक न आल्याने भाजीपाला पडून आहे. भाज्यांचे दर घसरलेत. 

Updated: Nov 11, 2016, 07:29 PM IST
सुट्ट्या पैशांची चणचण : वाशी मार्केटमध्ये भाजीपाला पडून, भाज्यांचे दर घसरलेत title=

नवी मुंबई : सुट्टे पैसे नसल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनी वाशीमधील घाऊक मार्केटकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ ग्राहक न आल्याने भाजीपाला पडून आहे. भाज्यांचे दर घसरलेत. 

दोन दिवसांपासून ही परस्थिती असल्यानं ज्या शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला. भाज्यांचे भाव 50 टक्के खाली उतरले आहेत.

500 ते 1000 रुपयाचे सुट्टे मिळत नसल्यामुळे किरकोळ व्यापारही थंडावलाय. यामुळे घाऊक मार्केटमध्येसुद्धा ग्राहक नाहीत. भाज्याचे भाव खाली उतरले असून, शेतकऱ्याकडून माल मागवणे बंद केले आहे, मार्केट मद्ये 450 गाड्याची आवक झाली पण तोही माल शिल्लक आहेत.

वांगी 1 रुपये किलो, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, तोंडली, टोमॅटो चार  ते पाच किलो, पडवळ 3 रुपये किलो, गाजर 4 रुपये किलो, बीट- 10 रुपये किलो भावाने विकले गेलेत.

दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार चेकने केले जाणार आहेत. चलनाच्या अडचणींमुळे रोखीचे व्यवहार काही काळ बंद राहतील. चेकने किती व्यवहार होतील याबाबत साशंकता आहे. मोठे व्यवहार चेकने होतील मात्र लहान व्यवहार होणं अवघड आहे.