वसई : वाहतूक पोलिसांच्या दादागिरीचा एक किस्सा, एका व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. हा किस्सा वसईत घडला असल्याचं समजतंय. रामसागर मिश्रा नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं एका वेबसाईटने म्हटलंय.
एका युवकाने नो पार्किंगमध्ये मोटारसायकल पार्क केल्याच्या आरोपावरून, व्हिडीओत हवालदार आणि त्या युवकाची शाब्दिक चकमक झाली आहे. यावेळी हवालदाराने या तरूणाची कॉलर धरून त्याला ओढण्याचा प्रयत्नही केला आहे.
"मला लायसन्स दे, मला लायसन्स जमा करण्याचे अधिकार आहेत", असं ठणकावून हा हवालदार पुन्हा-पुन्हा या युवकाला सांगतोय, पण हा तरूणही आपल्या भूमिकेवर ठाम दिसून येतोय, हा युवक म्हणतोय "मी तुम्हाला काय केलं, तुम्ही माझ्यावर हात का उगारताय, मी काय तुम्हाला काही बोललो का?" असे संवाद या व्हिडीओत ऐकू येतायत.
अखेर जे पोलिस एका मोटरसायकलवर तीन जणांना बसू देत नाहीत. ते पोलिस या तरूणाला मोटारसायकलवर ट्रीपल सीट घेऊन जातात. या तरूणाच्या मोटरसायरकलाचा नंबर असतांना, या तरूणाचं लायसन्स जमा करण्याची काय गरज होती?, पोलिसांची ही दादागिरी चव्हाट्यावर पाहून पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात काय प्रतिमा तयार होत असेल.
वसईच्या एव्हर शाईननगर जवळ ही घटना घडलीय. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, हवालदार अरूण सावंत आणि दीपक महाडीक यांच्याशी ही शाब्दिक चकमक झालीय.
वसई रेल्वे स्टेशनच्या बाहेर (वेस्ट) नो पार्किंग असा बोर्ड आहे, तिथे पोलिस लिहलेली एक बुलेट नेहमी पार्क केलेली असते. मात्र इतरांना तिथे बाईक पार्क करू दिली जात नाही. ही सोय फक्त एका हवालदारासाठीच असल्याची चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.