राजन वेळूकर यांच्यावर फौजदारी दाखल करा - आमदार पाटील

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांचे कुलगुरूपद धोक्यात आलय. वेळूकर कुलगुरूपदी अयोग्य़ असल्याचा निष्कर्ष हायकोर्टानं नोंदवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद नागपूर अधिवेशनातही उमटले. आमदार राहुल पाटील यांनी वेळूकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. 

Updated: Dec 12, 2014, 11:24 PM IST
राजन वेळूकर यांच्यावर फौजदारी दाखल करा - आमदार पाटील title=

नागपूर : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांचे कुलगुरूपद धोक्यात आलय. वेळूकर कुलगुरूपदी अयोग्य़ असल्याचा निष्कर्ष हायकोर्टानं नोंदवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद नागपूर अधिवेशनातही उमटले. आमदार राहुल पाटील यांनी वेळूकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. 

राजकीय वरदहस्तामुळंच वेळूकर कुलगुरू झाल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केलाय. यावर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्य़ात येईल असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलंय. कुलगुरूंविरोधात न्यायालयाने ओढलेले ताशेरे अशोभनीय आहेत, असं सांगतानाच याप्रकरणी एडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असं तावडेंनी काल नमूद केलं होतं.  

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

 सध्या नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनातही कुलगुरू निवडीचा हा वाद विकोपाला गेला आहे. कुलगुरूंविरोधात न्यायालयाने ओढलेले ताशेरे अशोभनीय आहेत, असं सांगतानाच याप्रकरणी अॅडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. 

राजन वेळूकर हे कुलगुरूपदासाठी अयोग्य असल्याचा असा निष्कर्ष मुंबई हायकोर्टानं काढलाय. मात्र अंतिम निर्णय़ासाठी वेळूकरांचं प्रकरण मुख्य़ न्यायाधिशांच्या नेतृत्वातल्या मूळपीठाकडे पाठवण्यात आलंय़. त्यामुळं त्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय. वेळूकर यांनी नियुक्ती प्रक्रियेत फेरफार केल्याचाही ठपका हायकोर्टानं ठेवलाय. 

वेळूकर यांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेले रिसर्च कागदपत्रं निवड समितीनं दुर्लक्षित केल्याचं नमूद करत निवड समितीलाही  हायकोर्टानं धारेवर धरलंय. डॉ. ए डी सावंत आणि गुणवंत पाटील यांनी वेळूकर यांच्या नियुक्तीविरोधात याचिका केलीय. वेळूकर यांच्या पीएचडीमध्ये घोळ असल्याचा आरोप डॉ. ए. डी. सावंत यांनी याचिकेत केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.