नवी मुंबई : ब्रिटनस्थित 'एसजीएफएक्स' कंपनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संचालक असल्याचं प्रकरण सध्या गाजतंय. या कंपनीचे एक संचालक सर्वेश गाडे यांनी मात्र शरद पवारांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केलाय. इतकंच नाही तर, या प्रकारामागे नेमकं कोण आहे? याचा खुलासा संध्याकाळपर्यंत करणार असल्याचंही त्यानं 'झी २४ तास'ला सांगितलंय.
अधिक वाचा - भल्याभल्यांना पाणी पाजणाऱ्या शरद पवारांनाही भेटले 'महाठग'!
या प्रकरणी पवारांनी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे याबाबत रितसर तक्रार केलीय. या तक्रारीमध्ये कंपनीचे प्रवर्तक-संचालक सर्वेश गाडे आणि शहनाझ भारदे यांनी आपल्याला न सांगता आपलं नाव टाकल्याचं म्हटलंय. तसंच या दोघांनी आपल्या सहीचीही नक्कल केल्याची तक्रार पवारांनी केलीय.
१३ डिसेंबर २०१० रोजी इंग्लंडमध्ये ही कंपनी रजिस्टर झाली. सुरूवातीला ७० कोटी रुपयांचं भांडवल असलेली ही कंपनी अवघ्या दीड वर्षांत ७० हजार कोटींवर पोहोचली.
कोण आहे हा सर्वेश गाडे...
सर्वेश गाडे पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला तो फसवणुकीच्या प्रकरणामुळे... 'मायक्रोसॉफ्टने एक परिक्षा घेतलीय आणि त्यामध्ये माझा देशात पहिला नंबर आला' असं त्यानं सर्वानां सांगितलं होतं. बील गेट यांनी स्वत: फोन करून आपलं अभिनंदन केल्याचंही त्यानं सांगितलं होतं.
त्याच्या या बातमीची बहुतांश वृत्तपत्रांनी दखल घेतली होती आणि बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. मात्र, दापोलीतील पत्रकार कैलास गांधी यांना या सगळा प्रकार बनाव वाटला. त्यांनी मायक्रोसॉफ्टवेअर कंपनीशी संपर्क साधला तेव्हा अशी कोणतीच परीक्षा आम्ही घेतलेली नसल्याचं सांगितलं.
सर्वेशला या प्रकाराबाबत विचारल्यावर त्यांनी आपली चूक कबूल केली आणि त्यानंतर हा सगळा बनाव उघड झाला होता. यानंतरही सर्वेश गाडे आणि त्याची त्याची पत्नी शेहनाज या दोघांनी अनेक जणांना गंडा घातल्याचंही समोर आलंय.
पाहा, काय म्हणतोय... सर्वेश गाडे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.