सातारा : मुंबई वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असणारे विलास शिंदे यांच्या पार्थिवावर सातारा येथील शिरगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज पहाटे सहाच्या सुमारास शिंदेचं पार्थिव वाई तालुक्यातल्या शिरगावात शिंदेचं पार्थिव दाखल झाले. संपूर्ण शिरगावात काल संध्याकाळपासून दुःखाचं सावट होतं. यानंतर सकाळी ऩऊच्या सुमारास शिरगावात शिंदेंच्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी पोलिसांनी सलामी दिली.
अत्यंसंस्कारा साताऱ्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते. शिरगावच्या स्मशान भूमीत त्यांना सलामी देण्यात आली. दरम्यान, मुंबईत शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज वरळीत कडकडीत बंद पाळण्यात बंद पाळण्यात आला.