साईंच्या दर्शनासाठी सामान्यांनाही VIP पास!

सामान्यांसाठी साईबाबांचे व्हिआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे.

Updated: Oct 12, 2016, 11:00 AM IST
साईंच्या दर्शनासाठी सामान्यांनाही VIP पास! title=

शिर्डी : सामान्यांसाठी साईबाबांचे व्हिआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे.

फक्त ठराविक व्यक्तींना मिळणारा व्हिआयपी पास आता कोणाच्याही शिफारशीशिवाय मिळणार असल्याने सामान्य साईभक्तांनाही बाबांचं झटपट दर्शन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वयोवृद्ध व्यक्तींच्या आणि एक वर्षांपेक्षा वयाने लहान मुल असणाऱ्या मातेसह कुटुंबातील सदस्यांना झटपट मोफत साईदर्शनाची व्यवस्था करण्यात आलीय. 

रुग्ण सेवेसाठीही साई संस्थानानं पुढाकार घेतलाय. अॅम्ब्युलन्सविना कोणत्याही गोरगरीब लोकांना आपला जीव गमवावा लागू नये, यासाठी राज्यातील जनतेसाठी ५०० अॅम्ब्युलन्स देण्याचा निर्णय साई संस्थानानं घेतलाय.