कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाऊस ठरला 'ताप'दायक

पावसाळा सुरु झाला आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. एकट्या जुन महिन्यात तापाचे ३ हजार ५४८ रुग्ण आढळलेत तर रक्ततपासणीत ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचं निष्पन्न झालय. तर अनेक डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळलेत. इतकी गंभीर बाब असली तरी दोन्ही शहरांत कोणतीही साथ नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीन करण्यात येतोय.

Updated: Jul 6, 2016, 10:19 PM IST
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाऊस ठरला 'ताप'दायक title=

ठाणे : पावसाळा सुरु झाला आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. एकट्या जुन महिन्यात तापाचे ३ हजार ५४८ रुग्ण आढळलेत तर रक्ततपासणीत ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचं निष्पन्न झालय. तर अनेक डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळलेत. इतकी गंभीर बाब असली तरी दोन्ही शहरांत कोणतीही साथ नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीन करण्यात येतोय.

ऐन पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीकर 'तापले'

दरवर्षीप्रमाणे यंदाचाही पावसाळा आला आणि घेऊन आला तो आजारपण. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने सध्या जोर धरला आहे. हा पाऊस काही नागरिकांसाठी ‘ताप’दायक ठरला आहे. याच कारण आहे दोन्ही शहरांत सध्या मोठ्या प्रमाणावर तापाचे रुग्ण आढळत आहेत. ते पाहता एखाद्या साथीच्या रोगाने डोकेवर काढले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत ब्राह्मणे या चार वर्षांच्या मुलाचा शुक्रवारी डेंग्यूने मृत्यू झाला. तो राहत असलेल्या विठ्ठल प्लाझा इमारतीतील आणखी काही रहिवाशांनादेखील डेंग्यूच्या आजाराने ग्रासले होतं. त्याचप्रमाणे डोंबिवली आणि आसपासच्या ग्रामीण भागात सुद्धा साथीचे रोग पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. 

एकीकडे स्वतः डॉक्टर असणाऱ्या स्थानिक नगरसेविका असे बोलत असतांना महापालिकेने मात्र डेंग्यूचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केलाय. इतकंच नव्हे तर शासनाच्या वतीन विशेष सर्वे केला गेला त्यातही एक सुद्धा डेंग्यूचा किंवा कुठल्याच साथीचा रुग्ण आढळला नसल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं असून केवळ वातावरणातील बदलांमुळे ताप येत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

ज्या डॉक्टरांनी डेंग्यू पोसिटीव असल्याच रिपोर्ट दिला आहे त्यांना आता नोटीस देण्याचा विचार महापालिका करत आहे. साथ आहे कि नाही हा वाद बाजूला ठेवला तरी कल्याण डोंबिवलीमध्ये तापाचे रुग्ण वाढल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच महापालिका आणि डॉक्टर यांच्या वतीन खालील सूचना आणि उपाय योजना सुचवल्या आहेत.

*ताप असल्यास त्वरित रक्ततपासणी करा
*घराच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्या. 
*डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरातील फुलदाणी, मनी प्लांट, वॉटरकूलर आदी ठिकाणचे पाणी आठवड्यातून एकवेळ पूर्णपणे बदला.
*घरातील साठा केले जाणारे पाणी आठवड्यातून पूर्णपणे बदला.
*जमिनीवरील व गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित लागतील, याची काळजी घ्या.
*पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. भाज्या, फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुऊन मगच खाण्यासाठी वापराव्यात.
*शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, याकडे विशेष लक्ष द्या.