व्हायरल होतोय या महिला पत्रकाराचा हा व्हिडीओ

 रेल्वेच्या फलाटावर फुलं विकणाऱ्या एका गरोदर महिलेला एका इसमाने इथं बसू नको, म्हणून हटवलं.

Updated: Apr 21, 2016, 09:58 PM IST

डोंबिवली : रेल्वेच्या फलाटावर फुलं विकणाऱ्या एका गरोदर महिलेला एका इसमाने इथं बसू नको, म्हणून हटवलं. या अशा वागण्याला पत्रकार अस्मिता पुराणिक यांनी विरोध केला, याचा त्यांनी व्हिडीओ त्यांच्या फेसबुकवर शेअर केला, यानंतर हा व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी शेअर केला.

पत्रकार अस्मिता पुराणिक यांनी त्यांच्या वॉलवर व्हिडीओ अपलोड करून लिहिलंय़....
अस्मिता पुराणिक यांनी लिहिलेले जसेच्या तसे खाली देत आहोत...

कोण आहे हा??????

इतकी हिम्मत....इतकी मस्ती....गरोदर स्त्री म्हणूनपण तमा बाळगली नाही......

नशीबाने माझी नजर पडली व ही बिचारी गरोदर स्त्री बचावली......

मी आज डोंबिवली रेल्वे ब्रिज वरून जात असताना एक दनकट इसम, एका फूल विकणार्‍या स्त्रीला जोरजोरात बडबड करून शिव्या घालत होता , मला पहिल्यांदा वाटले, फूल विकणारीचा नवरा असेल, मग त्याने त्या गरोदर स्त्रीला धक्का देत तिच्या फूलांची पाटी फेकली.

ते पाहून मला राहवले नाही मी धावत जाऊन त्याला रोखले...मग त्या इसमाला त्यांचे ओळख पत्र विचारले असता तो चिडून तिथून निघून जाउ लागला.....

कोण आहे हा ?
मुंबई पोलीस? रेल्वे पोलीस? R.P.F.?....?

कोणीही असले तरीही कोणी दिला याला अधिकार एका गरोदर स्त्रीला असे वागवण्याचा ?

एकटी गरीब स्त्री दिसली की लागले तिच्या मागे...

जराही विचार न करता सूरू केली हुकूमशाही....

एखादा फटका पोटावर बसला असतातर, कोणी वाचवले असते तिच्या अर्भकाला व तिला?.....

गर्भावस्थेत देखील ही स्त्री मेहनतीने चार फूलेच विकत होतीना...

डोंबिवलीच्या ब्रिजवर वेश्या व्यवसाय रोखण्याची हिम्मत करा.....

ऐका गरिब, मेहनती, एकट्या , वरून गरोदर स्त्रीवर कसली आपली ताकद दाखवताहेत....

कोण आहे हा ??????