एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी

दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60  पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली. 

Updated: Apr 21, 2016, 08:16 PM IST
एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी title=

औरंगाबाद : दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60  पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली. 

मेरी संस्थेच्या अहवालानंतर हाच दर 42. 50 रुपये करण्यात आला. 2003 पासून हा दर लागू करण्यात आला. पण अजुनही 42.50 या दरानं पैसे भरण्यास दारु कंपन्या तयार नाहीत. त्यामुळं 22 कोटी 88 लाख 36 हजार सातशे पंच्हात्तर रुपये येवढी मोठी थकबाकी य़ा कंपन्यांकडे आहे. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. 

कोणत्या कंपन्यांकडे किती थकबाकी

1 BDA LTD CHIKALTHANA          34,88,544
2 MAHARSHTRA DISTILLERIES 6,49,94,302
3 RADICO DISTILLERIES           2,37,25,866
4 SKOL BREWERIES                3,30,20,359
5MILLENNIUM  BEER IND LTD  2,69,31,018
6 AURANGABAD BREWERIES  1,92,02,879
7 FOSTER INDIA LTD                2,64,83,139
8 LILASONS INDUSTRIES         1,87,37,224
9 CARLS BERGS IANIA             9,59,736
10 INO-EUROPEON BREWERIES 1,12,93,708
   एकूण                       22,88,36,775

हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे त्यांच्याकडे आतची थकबाकी नाही तर 2003 ला वाद झाला तेव्हाची थकबाकी आहे