डोंबिवलीत बेकायदा बांधकामांमुळे पाणीटंचाई

डोंबिवलीतील २७ गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या नागरसेविकेनं केलाय. 

Updated: Mar 9, 2017, 08:21 AM IST
डोंबिवलीत बेकायदा बांधकामांमुळे पाणीटंचाई  title=

कल्याण : डोंबिवलीतील २७ गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या नागरसेविकेनं केलाय. 

याप्रकरणी आयुक्त ई.रवींद्रन यांच्याकडे तक्रार करूनही ते दखल घेत नाही. त्यामुळे २७ गावांमधील नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झालाय. १५ मार्चला महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपाच्या २७ गावांतील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनास दिलाय. 

२७ गावांमध्ये बेकायदा बांधकामं सुरू असून त्याविरोधात मनपा कुठलीही कारवाई करत नाही. बेकायदा बांधकामकांसाठी पाण्याचा बेसुमार वापर केला जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक करतायत.डोंबिवलीला लागून असलेल्या भोपर गावात तर प्यायलाही पाणी मिळत नाही. या भागात तर टँकरनं पाणीपुरवठा केला जातो.