घातक रसायनांमुळे लाखो लीटर पाणी दुषित

Updated: Feb 7, 2016, 04:21 PM IST
घातक रसायनांमुळे लाखो लीटर पाणी दुषित title=
एकीकडे भीषण दुष्काळ पडला असतांना नांदेडमधील आमदुरा बंधा-यातील तब्बल 11 दशलक्ष घन मीटर पाणी घातक रसायनांमुळे दुषीत झालंय. हे पाणी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी वापरु नये असा इशारा आरोग्य खात्यानं दिलाय. एवढं पाणी नांदेड शहरालाल तब्बल चार महिने पुरलं असतं.
 
पाणी दुषित झाल्यानं हे पाणी पूर्णपणे वापरास अयोग्य ठरवण्यात आलंय. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे घातक रसायन बंधा-यात कुठून आलं याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.