लग्नासाठी तगादा लावणा-या जावयाकडून मेहूणीवर जीवघेणा हल्ला

लग्नासाठी तगादा लावणा-या जावयाकडून मेहूणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपी जावयाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जखमी मेहूणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Updated: Dec 3, 2016, 11:08 AM IST
लग्नासाठी तगादा लावणा-या जावयाकडून मेहूणीवर जीवघेणा हल्ला title=

नागपूर : लग्नासाठी तगादा लावणा-या जावयाकडून मेहूणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपी जावयाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जखमी मेहूणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ आवळे नावाच्या ४० वर्षीय युवकाच्या पत्नीचा  २०१३ साली झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला.. त्यावेळी आरोपीची मेहूणी वंदना दुचाकी चालवत होती. या घटनेसाठी आरोपी सिद्धार्थ वंदनाला जबाबदार ठरवत असे आणि त्यामुळे वंदनाला लग्नासाठी आग्रह करत असे. दोन महिन्यापूर्वी वंदनाचे लग्न ठरल्यावर सिद्धार्थनं चिडून दुचाकीवरून जाताना भर रस्त्यात वंदनावर धारदार चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात वंदना गंभीर झाली. उपस्थित नागरिकांनी सिद्धार्थला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी सिद्दर्थविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून सिद्धार्थला अटक केली.