व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं एका ग्रुपच्या सदस्याला पोलीस कोठडीत जावं लागल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय. 

Updated: Mar 19, 2017, 11:08 PM IST
व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक

उल्हासनगर : व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं एका ग्रुपच्या सदस्याला पोलीस कोठडीत जावं लागल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय. विनय कलनानी असं या सदस्याचं नाव असून त्यानं शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास जय भोले नावाच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर एक व्हिडिओ पोस्ट केला.

या व्हिडिओमुळे काही सदस्यांच्या जातीय भावना दुखावल्या आणि त्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनयला अटक केली. न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.