मोबाईल वापरताना सावधान, सीमकार्ड तुमची डोकेदुखी ठरु शकते

मोबाईल वापरताना सावधान. कारण तुमचं सीमकार्डच तुम्हाला अडचणीत आणू शकतं. तुमच्या नावाचे बनावट कागदपत्र वापरून तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो.

Updated: Oct 15, 2015, 03:31 PM IST
मोबाईल वापरताना सावधान, सीमकार्ड तुमची डोकेदुखी ठरु शकते title=

यवतमाळ: मोबाईल वापरताना सावधान. कारण तुमचं सीमकार्डच तुम्हाला अडचणीत आणू शकतं. तुमच्या नावाचे बनावट कागदपत्र वापरून तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो.

यवतमाळ शहरातल्या मॅक मोटर्सचे संचालक असणाऱ्या दोघा बंधूंना इंटरनेट बँकिंग द्वारे तब्बल ५० लाख रुपयांनी गंडवण्यात आलंय. या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी गजाआड केलंय.

बनावट कागदपत्रांच्या आधारे ही टोळी व्यवसायीकांचे सीमकार्ड बंद करुन त्या नावाचे दुसरे सीमकार्ट मिळवायची. आणि या सीमकार्डच्या आधारे बँकेचे ऑनलाईन व्यवहार करायची. ऑनलाईन ट्रेडिंगच्या युगात अनेकांना या टोळीनं मोठ्या शिताफीनं लुबाडल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.