नवी मुंबई : 10 वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात 'क्लायमॅक्स'

कोणत्या घटनेमागे काय कारण लपलेलं असेल हे सांगता येत नाही, चार दिवसांपूर्वी कामोठ्यातून एका दहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. यामुळे नवी मुंबईतून मुलं पळवली जात असल्याची चर्चा सुरू झाली, पालकांनाही डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.

Updated: Jul 9, 2015, 12:17 PM IST
नवी मुंबई : 10 वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात 'क्लायमॅक्स' title=

मुंबई : कोणत्या घटनेमागे काय कारण लपलेलं असेल हे सांगता येत नाही, चार दिवसांपूर्वी कामोठ्यातून एका दहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. यामुळे नवी मुंबईतून मुलं पळवली जात असल्याची चर्चा सुरू झाली, पालकांनाही डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.

या मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं बनवली, अनेकांची झाडाझडती सुरू केली. पण मुलगी मिळत नव्हती. शाळेतून मुलगी बिल्डिंगच्या गेटवर आली आणि ती घरी आलीच नाही, तिला कोण घेऊन गेलं असावं असं मुलीच्या आईने सांगितलं.

पोलिसांची तपासचक्र फिरली

मुलीचं असं अपहरण म्हणजे मोठा मुद्दा, त्यामुळे मीडियाही सरसावली, या मुलीचं कुणी अपहरण केलं असावं? असे प्रश्न उभे राहू लागले, पोलिसंही चक्रावले, पण पोलिसांनी तपास सुरूच ठेवला.

पोलिसांनी ज्या महिलेच्या मुलीचं अपहरण झालं होतं, त्या मुलीच्या आईचं मूळ गाव गाठलं. या मुलीच्या वडिलांनी दोन वर्षापूर्वी जाळून घेत आत्महत्या केली होती. या मुलीच्या आईचे मुस्तफा या इसमाशी अनैतिक संबंध आहेत, तसेच ती दोन मुलींसह पळून गेल्याचं समोर आलं.

अपहरणातील क्लायमॅक्स
या मुलीच्या आईचे मुस्तफाशी अनैतिक संबंध होते, या संबंधात ही लहानगी आता त्यांना अडसर वाटायला लागली होती, तेव्हा आईकडूनच या मुलीच्या अपहरणाचा बनाव करण्यात आला. मुस्तफा आणि त्याचा मित्र दिनेश यांनी या मुलीला दिवा पॅसेंजरमध्ये बसवून दिलं. 

ही मुलगी दिवा येथे तिच्या चुलत भावाच्या पाणीपुरी स्टॉलवर पोहोचली, तिच्या भावाने तिला चेंबूरमध्ये तिच्या काकाकडे पोहोचवून दिलं. पोलिस अखेर या मुलीपर्यंत देखिल पोहोचले.

तेव्हा मुलीने आपल्याला आपल्या आईनेच सोडून दिल्याचे सांगितले. यावर संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली, यानंतर या महिलेने अपहरण नाट्याची कबुली दिली आहे. मात्र यामुळे पोलिसांना मोठा मनस्ताप झाला. या महिलेसह तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.