गोंदियात शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडताहेत, सरकारचे केवळ आश्वासन

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार अशी घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली. हिवाळा सुरु झाला. कडाक्याची थंडीही पडू लागली आहे. मात्र अद्याप खात्यावर पैसे जमा न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडत आहेत.

Updated: Nov 29, 2016, 09:14 AM IST
गोंदियात शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडताहेत, सरकारचे केवळ आश्वासन title=

गोंदिया : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार अशी घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली. हिवाळा सुरु झाला. कडाक्याची थंडीही पडू लागली आहे. मात्र अद्याप खात्यावर पैसे जमा न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेकडो आदिवासी मुलं थंडीत कुडकुडत आहेत.

गोंदिया दुर्गम आणि आदिवासी जिल्हा. या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांवर अवलंबून रहावं लागतं.. आमगाव आणि देवरी तालुक्यांत शासकीय आश्रमशाळांचं प्रमाण अधिक आहे.. मात्र या ठिकाणी या विद्यार्थ्यांना शासनाच्या किती सुविधांचा लाभ मिळतो हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.. स्वेटर खरेदी घोटाळ्याला आळा घालण्यासाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली.. थंडीचा कडाका वाढला मात्र अद्यापही या विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही.

सर्वच आश्रमशाळांमध्ये हिच अवस्था आहे.. त्यामुळे शासनाने घेतलेल्या र्निणयाची अंबलबजावणी होईल की नाही अशी शंका विद्यार्थ्यांकडून व्यक्त होतीये.. तर दुसरीकडे लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचं आश्वासन जनप्रतिनिधी देत आहेत.