सांगली : मच्छिंद्रगडमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त करण्यात आलेय. भविष्यात अनुचित प्रकार घडणार नसल्याची ग्वाही देण्यात आलेय.
सोशल मीडियावर मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. सांगली जिल्ह्यातील किल्लेमछिंद्रगड गावातील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडिया वरुन व्हायरल झाला होता. अनैतिक संबंधाच्या संशयावरून, एका महिलेला आणि एका पुरुषाला अमानुषपने मारहाण करण्यात आली होती.
या बाबतच्या बातम्या माध्यमातून प्रसारीत झाल्यावर, पोलीस आणि अंनिसने याची गंभीर दखल घेतली. इस्लामपूर पोलीस स्टेशन येथे अनिसचे कार्यकर्ते, पोलीस आणि गोपाळ समाजाच्या पंचांची बैठक झाली आहे. या बैठकीत गोपाळ समाजाच्या पंचांनी लेखी लिहून देत गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.