विचित्र, ३६ वर्षे बाळाचा सांगाडा महिलेच्या गर्भात

वैद्यकीय शास्त्रालाही आवाहन देणारी घटना नागपुरात घडली असून, येथील एका महिलेच्या पोटातून एका बाळाचा सांगाडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करीत काढला आहे. महत्वाचे म्हणजे, त्या महिलेच्या पोटात हा सांगाडा थोडे-थोडके नाही, तर गेल्या तब्बल ३६ वर्षापासून होता. 

Updated: Aug 19, 2014, 05:50 PM IST
विचित्र, ३६ वर्षे बाळाचा सांगाडा महिलेच्या गर्भात title=

नागपूर: वैद्यकीय शास्त्रालाही आवाहन देणारी घटना नागपुरात घडली असून, येथील एका महिलेच्या पोटातून एका बाळाचा सांगाडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करीत काढला आहे. महत्वाचे म्हणजे, त्या महिलेच्या पोटात हा सांगाडा थोडे-थोडके नाही, तर गेल्या तब्बल ३६ वर्षापासून होता. 

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना अचंभित करणारी ह घटना असून यात दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे त्या महिलेचे वय ६४ वर्षे आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती सुधारीत आहे. जगात अशा प्रकारच्या घटना फारस क्वचित घडत असल्याचे महिलेवर उपचार करणारे एनकेपी साळवे रुग्णालयातील सर्जरी विभागातील प्राध्यापक डॉक्टर बापुजी गेडाम यांनी सांगितले.

मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील पिपरिया गावात राहणारी ही महिला गरोदर असल्याने १९७८ मध्ये ती नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती झाली होती. बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झाल्याने आठव्या महिन्यात ती रुग्णालयात आली होती पण गर्भाशयातील बाळ मृत झाल्याचे समजल्याने तेव्हा संबंधित डॉक्टरांनी तिला गर्भपाताचा सल्ला दिला. पण गावात राहणाऱ्या या महिलेने हा सल्ला धुडकावला आणि गर्भापाताकरता तिने गावठी उपाय केले. त्यामुळे इतके वर्ष तिला बरे वाटले आणि काहीही त्रास तिला झाला नाही. पण गेले काही दिवसापासून पोट दुखत असल्याने ती नागपूरच्या या खाजगी रुग्णालयात भरती झाली.

महिला रुग्णालयात भरती झाल्यावर येथील डॉक्टरांनी तिच्यावर आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्यात. सोनोग्राफी, सिटी scan केले तेव्हा महिलेच्या पोटात गोळा असल्याचे डॉक्टरांना समजले. तो गोळा म्हणजे मृत बाळाचा सांगाडा असून गर्भाशयाच्या बाहेर तो असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी तिच्या पोटातून सांगाडा बाहेर काढला. हाडे, पाठीचा कणा सारखे अव्यय डॉक्टरांनी बाहेर काढले. गावठी उपाय केल्याने अर्भकाच्या शरीरावरील मांस इतक्या वर्षात गळून पडले होते, पण त्याची हाडे शिल्लक असल्याने महिलेला पोटदुखीचा त्रास होत असे. वैद्यकीय शास्त्राच्या इतिहासात हा एक चमत्कार असल्याचे देखील डॉक्टर म्हणाले.

तब्बल ५ तास शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी हा सांगाडा बाहेर काढला. साधे जेवण जास्त झाले तर आपल्याला पोटदुखी होत असताना, कुठलाही त्रास न होता हा सांगाडा तब्बल ३६ वर्ष या महिलेच्या पोटात कसा राहिला हे डॉक्टरांनी देखील न समजलेले एक कोडे आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.