निष्काळजीपणामुळे गोंदियात महिलेचा मृत्यू

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे गोंदिया शहरातील एका महिलेचा मृत्यू झालाय. शहरातील साई कॉलनी परिसरात राहणा-या रिता मेश्राम या कपडे वाळू घालण्यासाठी आपल्या छतावर गेल्या. त्यावेळी त्यांच्या छतावरुन गेलेल्या विद्यूत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून रिता यांचा मृत्यू झालाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 26, 2017, 07:29 PM IST
निष्काळजीपणामुळे गोंदियात महिलेचा मृत्यू  title=

गोंदिया : विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे गोंदिया शहरातील एका महिलेचा मृत्यू झालाय. शहरातील साई कॉलनी परिसरात राहणा-या रिता मेश्राम या कपडे वाळू घालण्यासाठी आपल्या छतावर गेल्या. त्यावेळी त्यांच्या छतावरुन गेलेल्या विद्यूत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून रिता यांचा मृत्यू झालाय.

विजेच्या तारा खाली आल्याची तक्रार वारंवार करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी विद्यूत विभागाचे कर्मचारी आले आणि त्यांनी तारेला विटा लावल्याने तार अजूनच खाली आली. त्यामुळे रिता यांच्या मृत्यूला महावितरणचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.