कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये वृद्ध महिलेचा पाय शौचालयात अडकला, १० तासानंतर सुटका

 कोकण रेल्वेच्या कोकणकंन्या एक्सप्रेसमधल्या शौचालय अडकून पडलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १० तासांच्या प्रयत्नानंतर हे यश आले.

Updated: Dec 11, 2015, 03:11 PM IST
कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये वृद्ध महिलेचा पाय शौचालयात अडकला, १० तासानंतर सुटका title=

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या कोकणकंन्या एक्सप्रेसमधल्या शौचालय अडकून पडलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १० तासांच्या प्रयत्नानंतर हे यश आले.

मुंबईहून मडगावला  ट्रेन निघाली होती. ६८ वर्षांच्या रबीया बी या शोचालयात रात्री एक वाजता गेल्या होत्या. खेड रेल्वे स्टेशननजीक त्यांचा पाय शौचालयता घरसला आणि त्या अ़डकून राहिल्यात. खेड रेल्वे स्टेशन नजीक याची माहिती मिळाली. त्यानंतर या महिलेला बाहेर काढण्य़ाचा प्रयत्न झाला.

चिपळून रेल्वे स्थानकावर सुद्धा या महिलेला काढण्यासाठीचे प्रयत्न झाले. मात्र त्यानंतर कोकण रेल्वे थेट रत्नागिरीला आणली गेली. या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून गेले १० तासानंतर या महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलाय. कोकण रेल्वेचे अधिकारी गँस कटरच्या माध्यमातून या महिलेला बाहेर काढल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.