लोणावळा : लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी एक नवी माहिती समोर आलीय. मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे उघड झालंय..
पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालात माहिती समोर आलीय. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या एका तरुण आणि तरुणीची डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आलीय. सार्थक दिलीप वाघचौरे आणि श्रृती संजय डुंबरे अशी खून झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
लोणावळयाजवळील भुशी धरणानजिकच्या डोंगरावर हे हत्याकांड घडलंय. या तरुण आणि तरुणीचे मृतदेह हे विवस्त्र आणि छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आले होते... या प्रकरणी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे समोर असलं तरी त्यांची हत्या का करण्यात आली? याचं गूढ कायम आहे.
दरम्यान सिंहगड महाविद्यालय ते लोणावळा शहर पोलीस स्टेशन असा कँडल मार्च काढला. दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.