नाशिक : नाशिकमध्ये एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण विटकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
नाशिकमधल्या सातपूर परिसरातल्या इएसआय हॉस्पिटलजवळ त्याचा मृतदेह आढळला. रात्री या ठिकाणी पार्टी झाली असावी आणि दारुच्या नशेत त्याचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
दुसरीकडे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत चेहडी जवळ दारणा नदीकाठावर संशयास्पद मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही. शहरात एकाच रात्रीत दोन खून झाल्यानं पोलीस खडबडून जागे झालेत.