काँग्रेसला दणका, रोहिदास लोखंडेंचा राजीनामा

मुंबई काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष रोहिदास लोखंडे यांनी ओबीसी सेलच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिलाय. लोखंडे यांच्यासह सेलच्या पदाधिका-यांनीही राजीनामे दिलेत. काँग्रेस आमदार मधु चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी मिळाल्यानं, रोहिदास लोखंडे नाराज झाले होते.

Updated: Feb 3, 2012, 09:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष रोहिदास लोखंडे यांनी ओबीसी सेलच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिलाय. लोखंडे यांच्यासह सेलच्या पदाधिका-यांनीही राजीनामे दिलेत. काँग्रेस आमदार मधु चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी मिळाल्यानं, रोहिदास लोखंडे नाराज झाले होते.

 

आमदार खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देणार नाही, या माणिकराव मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं काय झालं असा सवालही त्यांनी दोन दिवसांपूर्वी उपस्थित केला होता.

 

कार्यक्रमासाठी गाड्या भरुन जनता आणण्यासाठी केवळ आमची आठवण होते का, असा सवाल करणा-या रोहिदास लोखंडेंनी अखेर पक्षाचा राजीनामा दिलाय.

Tags: