निवडणुकीची रणधुमाळी

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागलाय.. मुंबई महापालिकेसाठी आघआडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर, महायुतीचा वचननामा आज जाहीर झाला.. यात मुंबईकरांवर अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आलीय. रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या विषयावर या वचननाम्यात भर देण्यात आलाय.

Updated: Feb 10, 2012, 12:21 AM IST

www.24taas.com

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागलाय.. मुंबई महापालिकेसाठी आघआडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर, महायुतीचा वचननामा आज जाहीर झाला.. यात मुंबईकरांवर अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आलीय. रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या विषयावर या वचननाम्यात भर देण्यात आलाय.

तर काँग्रेस आघाडीच्या मुंबई मनपाच्या प्रचाराची सुरुवात आज होतेय. यासाठी शरद पवारांसह दोन्ही पक्षांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत मुंबईत जाहीर सभा होतेय. तर शिवसेना संपूवू, असं वक्तव्य करणा-या मुख्यमंत्री आणि शिवसेनेत जुंपलीय.. मुख्यमंत्र्यांच्या अनेक पिढ्या खाली अतपरल्या तरी शिवसेना संपणार नाही.

असा पलटवार उद्धव ठाकरेंनी सीमवर केलाय... शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी सुप्रीम कोर्ट गाठणा-या राज ठाकरेंची तिथेही निराशा झालीय. सुप्रीम कोर्टानंही परानगी नाकारल्यानं नाराज झालेल्या राज ठाकरेंनी कोंडी केली जात असल्याची प्रतिक्रिया दिलीय.. ऐन थंडीत नाशकात राज यांचा तर पुण्यात अजितदादांच्या रोड शोनं प्रचाराचं रान पेटू लागलय..

Tags: