मुंबई-गोवा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

मुंबई-गोवा महामार्गावरील सततच्या होणा-या अपघांतांमुळे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळाच बनला आहे... गेल्या पाच वर्षात या महामार्गावर तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त अपघात झाले असून   त्यामध्ये आतापर्यंत सातशे जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

Updated: Dec 17, 2015, 04:35 PM IST
मुंबई-गोवा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा title=

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील सततच्या होणा-या अपघांतांमुळे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळाच बनला आहे... गेल्या पाच वर्षात या महामार्गावर तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त अपघात झाले असून   त्यामध्ये आतापर्यंत सातशे जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

मुंबई-गोवा महामार्गावर काही अपघाती ठिकाणं बनली असून त्या परिसरात अपघात नित्याचा बनला आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, भरणे, चिपळूण, सावर्डे, भोस्ते घाट, बावनदी, निवळी घाट, आंडणारी, वाटूळ आणि राजापूर ही त्यापैकीच काही ठिकाणं आहेत. सण- उत्सवांच्या काळात  अपघातात लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळते.

वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचं पाल आणि वेगमर्यादेचं उल्लंघन यामुळे अपघात वाढत आहेत.एकीककडं अपघात वाढत असतांना वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दुर्लक्ष केलं जात आहे.ही अत्यंत गंभीर बाब असून अपघात रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे

मुंबई - गोवा मृत्यूचा महामार्ग !
 

२०१०
६७५ अपघात
१८२ मृत्यू

२०११
६११ अपघात
१३६ मृत्यू

२०१२
६१९ अपघात
१२४ मृत्यू

२०१३
४८७ अपघात
१२२ मृत्यू

२०१४
४५७ अपघात
९३ मृत्यू

२०१५
३१० अपघात
७९ मृत्यू