मतदानाच्या तारखांना हायकोर्टात आव्हान!

मुंबई महापालिका मतदानाच्या तारखांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुंबई महापालिका कायद्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि मतदानाच्या तारखेमध्ये २१ दिवसांचं अंतर असावं लागतं.

Updated: Feb 9, 2012, 01:56 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिका मतदानाच्या तारखांना आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुंबई महापालिका कायद्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि मतदानाच्या तारखेमध्ये २१ दिवसांचं अंतर असावं लागतं.

 

यंदाच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख ३१ जानेवारी होती आणि १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि मतदानाच्या तारखेमध्ये २१ दिवसांचं अंतर असावं  या कायद्याचं उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

 

याचसंदर्भात वॉर्ड क्रमांक ११५ च्या अपक्ष उमेदवार अनघा कोल्हे यांनी याचिका दाखल केली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे. निवडणुकीची तारीख जवळ आली असल्यामुळे सगळ्याच नेत्यांच्या प्रचार सभांना जोर आला आहे. जर निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलल्या, तर पुन्हा सर्व बाबींची फेरमांडणी करावी लागेल आणि निवडणुकीचा खर्च वाढेल.  याशिवाय ज्या उमेदवारांना अर्ज भरणं शक्य झालं नव्हतं, त्यांना या निमित्ताने पुन्हा संधी मिळू शकते.