mumbai municipality election

शिवसेनेचे सुनील प्रभू मुंबईचे महापौर

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे सुनील प्रभू यांची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे सुनील मोरे यांचा पराभव केला. अपक्षांच्या मदतीनं प्रभू यांनी बहुमताची मॅजिक फिगर गाठली.

Mar 9, 2012, 03:28 PM IST

शिवसैनिक हिच बाळासाहेबांची संपत्ती- राऊत

गेल्या ४५ वर्षात देश आणि राज्याच्या रक्षणासाठी उभे राहिलेले लाखो शिवसैनिक हीच बाळासाहेबांची संपत्ती असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर केला आहे.

Feb 15, 2012, 04:21 PM IST

राज ठाकरेच ठरणार 'किंगमेकर' ?

येत्या महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंगमेकरची भूमिका वठवतील. मुंबई पोलीस आणि राज्य गुप्तचर विभाग यांनी महापालिका निवडणुकीचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला त्यात हे मांडण्यात आलं आहे.

Feb 11, 2012, 03:33 PM IST

शिवसेनेचं लक्ष सोन्याच्या अंड्यांवर- पवार

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असताना शिवसेनेचे नेते मात्र मुंबईतच बसून होते. मुंबई ही शिवसेनेसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असून या सोन्याच्या अंड्यावर शिवसेनेचं लक्ष असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.

Feb 10, 2012, 01:43 PM IST

मतदानाच्या तारखांना हायकोर्टात आव्हान!

मुंबई महापालिका मतदानाच्या तारखांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुंबई महापालिका कायद्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि मतदानाच्या तारखेमध्ये २१ दिवसांचं अंतर असावं लागतं.

Feb 9, 2012, 01:56 PM IST

सेना भवनाचा आधार घेणं हा दुबळेपणा- उद्धव

"कुणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी सेना भवनाचा आधार घेणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे." असा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.

Feb 8, 2012, 04:12 PM IST

आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Feb 8, 2012, 11:43 AM IST

काँग्रेस बॅकफूटवर !

मुंबईची सलग सत्ता उपभोगणाऱ्या य़ुतीला खाली खेचण्याची कॉंग्रेसने पूर्ण तयारी केली होती. पण काँग्रेसच्याच अजित सावंतानी बंड करत थेट काँग्रेसच्या तिकीटवाटपातला घोळ मुंबईसमोर आणला.

Feb 3, 2012, 12:53 PM IST

राज ठरणार का 'किंगमेकर' ?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांच्या चर्चेचा विषय आहे तो राज ठाकरेंच्या मनसेचा. उमेदवारीसाठी परीक्षा, त्यानंतर मुलाखती आणि सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करून राज यांनी बाजी मारली, पण नाराजांनी दोन दिवस केलेल्या उद्रेकानं मनसेसाठीही आव्हान सोपं नसल्याचं समोर आलं.

Feb 3, 2012, 09:03 AM IST

महापालिकेचा शिपाई निवडणुकीच्या रिंगणात

मुंबईतल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पालिकेचा शिपाईही उतरला आहे. शिपाई पदावर काम करणाऱ्या जिंतेद्र वळवी याला आता पालिकेचा सभागृह खुणावत आहे.

Feb 2, 2012, 06:32 PM IST

फॉर्म भरायला 'मनसे' मिरवणूक

निवडणुकीसाठी वाट्टेल ते असंच चित्र घाटकोपरमध्ये पहायला मिळालं आहे. मनसे आमदार राम कदम यांच्या विभागातील मनसेचे सहा उमेदवार निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी वाजतगाजत निघाले .

Jan 31, 2012, 09:01 PM IST

आ गया है देखो 'बॉडीगार्ड' !

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक आहे.

Jan 25, 2012, 10:34 PM IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा पेच

काँग्रेस मुंबईत १६९ जागा लढवणार आहे, तर त्यांच्या कार्यालयातून तब्बल अडीच हजार अर्ज वितरित झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५८ जागा लढवणार असून ४९८ जण उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.

Jan 24, 2012, 08:57 PM IST

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपनं मुंबई महापालिकेसाठी ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यात माजी उपमहापौर विद्या ठाकूर यांच्यासह चार नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपमधलं गटातटाच्या राजकारणाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला.

Jan 24, 2012, 06:03 PM IST

शिवसेनाप्रमुख टोचणार शिवसैनिकांचे कान

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. आज संध्याकाळी मुंबईतल्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी शिवसेनाप्रमुख संवाद साधणार आहेत.

Jan 19, 2012, 11:37 AM IST