www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पालिकेचा शिपाईही उतरला आहे. शिपाई पदावर काम करणाऱ्या जिंतेद्र वळवी याला आता पालिकेचा सभागृह खुणावत आहे. त्याच्या आकांक्षेला वाव देण्यासाठी शिवसेनेनं जितेंद्रला वॉर्ड क्रमाक ४७ मधून उमेदवारी दिली आहे.
आता मुंबई महापालिकेत शिपाई पदावर काम करणारा जिंतेद्र वळवी पालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. बाबूंच्या केबिनबाहेर बसणाऱ्या जितेंद्रला आता सभागृहात निवडून येऊन, बाबूंकडून काम करवून घ्यायचं आहे. २३ जूलै २०११ ला शिपाई पदावर रूजू झालेल्या जितेंद्र वळवीनं नोकरीचा राजीनामा देऊन रणसंग्रामात उडी घेतली आहे.
आदिवासी असलेला जिंतेद्र वळवी याच वॉर्ड क्रमांक ४७ मध्ये लहानाचा मोठा झाला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेल्या, जितेंद्रने सभागृहामध्ये आदिवासींचे प्रश्न सभागृहात हिरीरीने मांडणार असल्याचं सांगितलं आहे. महापालिकेत या आधी पाणी विभागात प्लंबर असलेला गौतम साबळे नगरसेवकाच्या पदापर्यंत पोचला होता.