विक्रोळीत शिवसेना विरुद्ध आरपीआय !

शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे नेते महायुतीचे गोडवे गात असले तरी विक्रोळीत या महायुतीला भगदाड पडलं आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या आरपीआयनं थेट शिवसेनेसमोरच आरपीआयचा उमेदवार उभा केला आहे.

Updated: Feb 4, 2012, 10:25 PM IST

पंकज दळवी, www.24taas.com, मुंबई

शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे नेते महायुतीचे गोडवे गात असले तरी विक्रोळीत या महायुतीला भगदाड पडलं आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या आरपीआयनं थेट शिवसेनेसमोरच आरपीआयचा उमेदवार उभा केला आहे.

महायुतीच्या जागावाटपात विक्रोळीतील कन्नमवार नगर वॉर्ड क्रमांक ११२ शिवसेनेच्या पारड्यात पडली. परंतु आरपीआयतर्फे या वॉर्डासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे महायुतीला धक्का बसला आहे. वॉर्ड क्र ११२ मधून आरपीआयतर्फे शोभा कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, याच वॉर्डातून शिवसेनेतर्फे श्रद्धा रूके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या बंडखोरीवरून महायुतीत काही आलबेल नसल्याचं पुढे येत आहे.

वॉर्ड क्रमांक ११२ मध्ये दलित मतदारांची संख्या मोठी असल्यामुळे आरपीआयनं या जागेची मागणी केली होती. आता आरपीआयकडूनही शोभा कदम यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं विक्रोळीत महायुतीला भगदाड पडलं आहे. एरव्ही, महायुतीतले नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करतात. मात्र आरपीआयनं उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महायुतीतील नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.