www.24taas.com, मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेवर सेना-भाजपचा भगवा पुन्हा फडकविण्यासाठी आता या निवडणुकीच्या रणसंग्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांनी उडी घेतली आहे.
खुद्द बाळासाहेब यांनी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आता बाळासाहेब निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय होणार असून मुंबई आणि ठाण्यात शिवसेनाप्रमुख सभा घेणार असल्याची माहिती शिवसेनेतील सुत्रांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी तर दुसरी सभा मुंबईत १३ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, बाळासाहेब निवडणुकीत प्रचार करणार का? कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार का? या सगळ्या गोष्टींवर आज पडदा पडला आहे. बाळासाहेब यांनी पुन्हा एकदा जोमाने निवडणुकीसाठी तयारी केल्याचे दिसते.