आबा सारखे बॉम्बस्फोट का होतात?- पवार

महाराष्ट्रातच वारंवार बॉम्बस्फोट का होतात? अशा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर. आऱ. पाटील यांना विचारला आहे. बॉम्बस्फोट झाल्यावर एकाच समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तयार होत आहे

Updated: Aug 5, 2012, 10:56 AM IST

www.24taas.com, लंडन

 

महाराष्ट्रातच वारंवार बॉम्बस्फोट का होतात? अशा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर. आऱ. पाटील यांना विचारला आहे. बॉम्बस्फोट झाल्यावर एकाच समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तयार होत आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्याला धोका निर्माण झाला आहे याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे.  महाराष्ट्रात वारंवार होणार्‍या बॉम्बस्फोटांमुळे या ठिकाणचे पोलीस दल व गुप्तचर यंत्रणा काय करतात असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

 

दिल्लीत आम्हाला त्याची उत्तरे द्यावी लागतात. राज्याची सुरक्षा सांभाळणार्‍या यंत्रणेवर गृहमंत्रालयाचा धाक असला पाहिजे. त्यापुढे जाऊन ज्या अधिकार्‍यांचे काम रिझल्ट ओरिएंटेड नसेल त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज गृहमंत्री आर. आर .पाटील यांचीच कानउघाडणी केली. पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांत कुणाचा मृत्यू किंवा फार मोठी हानी झाली नाही ही समाधानाची गोष्ट आहे.

 

पण वारंवार होणार्‍या बॉम्बफोटांत निरपराध लोक उगाच मारले जातात, असे नमूद करून पवार म्हणाले, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यसांदर्भात चार वर्षांपूर्वी निर्णय झाला. त्यानंतर आपले काही मंत्री ते पाहण्यासाठी लंडनलाही जाऊन आले पण अद्याप त्याचे टेंडर निघाले नाही. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी तीन जणांची समिती स्थापन करण्यात आली असून एवढा वेळ त्यासाठी का लागत आहे.