'इंदू मिलचा प्रश्न सोडवा'- आठवले

इंदू मिलचा प्रश्न गेले काही दिवस चागंलाच पेटला आहे. आंबेडकर स्मारकासाठी संपूर्ण जमिनीची मागणी ही करण्यात आली आहे. त्याला कालच तत्वत: मान्यता देण्यात आली आहे . इंदू मिलच्या जागेसंदर्भात पंतप्रधानांनी २६ जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Updated: Jan 2, 2012, 03:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

इंदू मिलचा प्रश्न गेले काही दिवस चागंलाच पेटला आहे. आंबेडकर स्मारकासाठी  संपूर्ण जमिनीची मागणी ही करण्यात आली आहे. त्याला कालच तत्वत: मान्यता देण्यात आली आहे .  इंदू मिलच्या जागेसंदर्भात पंतप्रधानांनी २६  जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

२६ जानेवारीपर्यंत इंदू मिलबद्दल निर्णय घेतला नाही, तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा आठवलेंनी दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह दिल्लीला याबाबत शिष्टमंडळ गेलं होतं. यात सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. गेल्या वेळेस झालेलं आदोलंन त्यामुळे सरकारने इंदू मिलचा प्रश्न निकालात काढण्याचे ठरवल्याचं दिसतं. त्यामुळे पुन्हा एकदा हे आंदोलन होणार नाही याची सरकारकडून काळजी घेतली जाईल.

दिल्लीला या शिष्टमंडळाला पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यास तत्वता मान्यता दिली आहे. आता ही जागेबाबतचा अंतिम निर्णय २६ जानेवारीच्या आत घ्यावा, अशी मागणी करत आठवलेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा नारा पुकारला आहे.