एअर इंडिया विमानात चक्क उंदीर, विमान रद्द

 मुंबई ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात चक्क उंदीर सापडला. त्यामुळे विमान रद्द करण्याची वेळी कंपनीवर आली.

Updated: Dec 30, 2015, 07:34 PM IST
एअर इंडिया विमानात चक्क उंदीर, विमान रद्द title=

मुंबई :  मुंबई ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात चक्क उंदीर सापडला. त्यामुळे विमान रद्द करण्याची वेळी कंपनीवर आली.

विमानात उंदीर असल्याची तक्रार एका प्रवाशांने केली. या तक्रारीनंतर विमान रद्द करण्यात आले. त्यानंतर एअर इंडिया कंपनीकडून प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आली. 
 
एअर इंडियाचे विमान क्रमांक AI 131  हे विमान मुंबईहून लंडन निघाले होते. तेहरानजवळ विमानात उंदीर असल्याचे समजताच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी  हे विमान परत बोलवण्यात आले.  याप्रकरणी डीडीसीएने तातडीने या घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.