'एक हाथ की सफाई' आता गजाआड

मुंबईत कुर्ला रेल्वे पोलीसांनी एका हाताने चोरी करणा-या एका अपंग चोराला गजाआड केलं आहे. गेल्या चार वर्षापासून हा चोर मुंबईच्या लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याचा गाड्यांतील प्रवाशांना लुटत होता. त्याच्याकडून आतापर्यंत चोरीचे 12 महागडे मोबाईल जप्त केलेत

Updated: Oct 21, 2011, 06:41 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत कुर्ला रेल्वे पोलीसांनी एका हाताने चोरी करणा-या एका अपंग चोराला गजाआड केलं आहे. गेल्या चार वर्षापासून हा चोर मुंबईच्या लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याचा गाड्यांतील प्रवाशांना लुटत होता. रेल्वे ट्रॅकवरील खांबांवर लपून उभा राहून ट्रेनचा गेटवर फोनवर बोलत असलेल्या प्रवाशांच्या हातावर लाकडी किंवा लोखंडी रॉडनं फटका मारायचा आणि त्यांचामोबाईल चोरून पळून जायचा.

 

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी आरोपी मोहम्मद शेखचा एक हात चोरी करतानाच लोकल ट्रेन खाली आला आणि कायमचा निकामी झाला. मात्र नंतर तो एका हातानेच चोरी करायचा. या अट्टल गुन्हेगाराला ड्रग्जचं व्यसन आहे. त्याच्यासाठीच तो हात गेल्यानंतरही चोरी करायचा.

 

कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपी शेख कडून आतापर्यंत चोरीचे 12 महागडे मोबाईल जप्त केलेत. न्यायालयाने त्याला 15 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Tags: