गणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार - गृहमंत्री

रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Updated: Apr 5, 2012, 04:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

तसचं मूर्ती चोरांच्या शोधासाठी पोलिसांची १२ पथकं तयार करण्यात आली आहेत.  याकामी इतर राज्यांची मदतही घेतली जाणार असल्याची माहिती आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिली.  श्रीवर्धन तालुक्यातील  दिवे आगरमध्ये पेशवेकाळीन गणेश मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा घालण्यात आला होता. याबाबत शिवसेनेने आंदोलन केले होते.

आणखी संबंधित बातम्या

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.
.
---------------------------------------------------

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
.
---------------------------------------------------