...तर सीमावासीय कर्नाटकात राहिले तरी चालतील

कर्नाटकातील मराठी माणसे महाराष्ट्रात येतील तर आनंदच आहे. परंतु, महाराष्ट्रात काही आलबेल नाही, त्यामुळे झक मारली आणि महाराष्ट्रात आलो, अशी परिस्थिती होऊ नये. त्यामुळे सीमाप्रश्नाला भावनिक मुद्दा न करता त्यावर व्यवहार्य तोडगा काढणे गरजेचे

Updated: Dec 19, 2011, 04:26 PM IST

राज ठाकरे यांची सीमाप्रश्नी व्यवहार्य तोडगा

झी २४ तास वेब टीम, मुंबई

कर्नाटकातील मराठी माणसे महाराष्ट्रात येतील तर आनंदच आहे. परंतु, महाराष्ट्रात काही आलबेल नाही, त्यामुळे झक मारली आणि महाराष्ट्रात आलो, अशी परिस्थिती होऊ नये. त्यामुळे सीमाप्रश्नाला भावनिक मुद्दा न करता त्यावर व्यवहार्य तोडगा काढणे गरजेचे असल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मांडली.

 

सीमाप्रश्न गेल्या ५५ वर्षांपासून सुरू आहे. या आंदोलनात एक पिढी बरबाद झाली. आपल्या देशात प्रश्न निर्माण केले जाते. त्यावर तोडगा काढला जात नाही, या प्रश्नी तोडगा काढायचा असल्यास तो व्यवहार्य असायला हवा. यासाठी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

 

सीमावासियांना नेमकं काय हवं आहे. त्यांना मराठी म्हणून की महाराष्ट्रात यायचं आहे म्हणून छळ होतोय. हे त्यांनी ठरवून घ्यावे. कर्नाटकातील सरकार मराठी भाषेचा, मराठी माणसांचा मान राखून त्यांना योग्य स्थान दिल्यास सीमावादावर व्यवहार्य तोडगा निघू शकतो. त्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा किंवा आंदोलन करण्याची गरज नाही. या प्रश्नात महाराष्ट्रातील राजकारण्याचा खेळ होतोय, पण कर्नाटकातील मराठी माणसाचा जीव जातोय, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

 

सीमाप्रश्न एनडीएच्या काळातच सुटला असता, शिवसेनेच्या खासदारांनी त्याचवेळी योग्य बाजू मांडली असती, तर आज ही वेळ आली नसती. यांना काय जातं येथं आंदोलन करायला. तिथे मराठी माणसाची डोकी फुटतात. त्यामुळे मराठी माणसाला त्रास होऊ नये यासाठी तोडगा निघणं आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

[jwplayer mediaid="15361"]

 

[jwplayer mediaid="15436"]

 

Tags: