'तो' अखेर ती' होणार.. लिंग बदलाला परवानगी

गुवाहाटीच्या २१ वर्षीय विधान बरुआला मुंबई हायकोर्टानं अखेर लिंगबदलाची परवानगी दिली आहे. राज्यात अथवा केंद्रात लिंग बदलण्याला विरोध करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही.

Updated: May 7, 2012, 04:24 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गुवाहाटीच्या २१ वर्षीय विधान बरुआला मुंबई हायकोर्टानं अखेर लिंगबदलाची परवानगी दिली आहे. राज्यात अथवा केंद्रात लिंग बदलण्याला विरोध करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. विधान हा सज्ञान आहे त्यामुळं त्याचा निर्णय घेण्यासाठी तो सक्षम असल्याचं कोर्टानं आपल्या निकालात नमूद केलं आहे.

 

हायकोर्टाच्या या महत्वपूर्ण निकालामुळं विधानचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानला लिंग बदल करून मुलगी व्हायचं आहे. मात्र त्याच्या या शस्त्रक्रियेला त्याच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळं त्यानं  आई-वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसंच हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती.

 

विधाननं दाखल केलेल्या या याचिकेच्या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं. कारण लिंगबदलाच्या संदर्भातली देशातली ही पहिलीच याचिका होती. त्यामुळं कोर्ट काय निर्णय देणार याची उत्सुकता होती. आता कोर्टानं मुंबई हायकोर्टाच्या या निकालामुळं आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.