'दक्षिण आफ्रिका ते कॅनडा व्हाया मुंबई' पुस्तकाचे प्रकाशन

डॉ.विजय ढवळे लिखीत ‘दक्षिण आफ्रिका ते कॅनडा व्हाया मुंबई’ आणि ‘तारे-सितारे’ या पुस्तकांचा प्रकाश सोहळा दादरच्या वनिता समाज इथे पार पडला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते ‘दक्षिण आफ्रिका ते कॅनडा व्हाया मुंबई’ आणि सिने निर्माती कांचन अधिकारी यांच्या हस्ते ‘तारे-सितारे’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले

Updated: Jan 17, 2012, 04:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

डॉ.विजय ढवळे लिखीत ‘दक्षिण आफ्रिका ते कॅनडा व्हाया मुंबई’ आणि ‘तारे-सितारे’ या पुस्तकांचा प्रकाश सोहळा दादरच्या वनिता समाज इथे पार पडला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते ‘दक्षिण आफ्रिका ते कॅनडा व्हाया मुंबई’ आणि सिने निर्माती कांचन अधिकारी यांच्या हस्ते ‘तारे-सितारे’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रकाशभाई मोहाडीकर, खास इस्त्रायलमधून आलेले नोहा मस्सील यांची विशेष उपस्थिती लाभली. नोहा मस्सील वीस वर्षाहून अधिक काळ मायबोली हे मराठी त्रैमासिक इस्त्रायलमधून प्रकाशीत करतात. या पुस्तकांचे प्रकाशन नवचैतन्य प्रकाशनाने केलं आहे.

 

डॉ.विजय ढवळे हे गेली पसतीस वर्षे कॅनडात स्थाईक झाले आहेत. डॉ.ढवळे यांची याआधी १८ पुस्तके प्रकाशीत झाली आहे. अनेकविध क्षेत्रात संचार करणारे डॉ.ढवळे हे ख्यातनाम दंतवैद्यक आहेत. उद्योग आणि व्यापारातही त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. अनेक क्षेत्रात व्यस्त असणारे डॉ.ढवळे सातत्याने लिखाण आणि तेही मराठीत करतात हे विशेषत्वाने नमुद करण्यासारखे आहे. आजवर ऐंशीहून अधिक पुरस्कारांनी डॉ.विजय ढवळे यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

 

कॅनडात हॉटेल इंडस्ट्रीत आपल्या कर्तबगारीने दबदबा निर्माण करणाऱ्या अश्विन गोपाल या उद्योजकाच्या जीवन संघर्षावर 'दक्षिण आफ्रिक ते कॅनडा व्हाया मुंबई' हे पुस्तक आधारीत आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्म आणि बालपण, मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण आणि निर्धाराने व्यवसायासाठी कॅनडाची केलेली निवड आणि तिथला आश्विन गोपालांचा प्रवास आपल्याला त्यांच्या असाधरण व्यक्तिमत्वाची ओळख करुन देतो.

 

 

डॉ.ढवळेंनी बॉलिवूडच्या सिताऱ्यांवर लिहिलेलं तारे-सितारे असंच एक उल्लेखनीय पुस्तक ज्यात नाविन्यपूर्ण माहितीचा खजिना वाचकाला गवसतो.

Tags: