पाहाः अकरावीची पहिली यादी जाहीर

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी ५ वाजता जाहीर झाली आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २८ ते ३० जून या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचे आहेत. अकरावीला १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

Updated: Jul 4, 2012, 05:39 PM IST

www. 24taas.com, मुंबई 

 

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी ५ वाजता जाहीर झाली आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २८ ते ३० जून या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचे आहेत. अकरावीला १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी १ लाख ८८ हजार ७९६ विद्यार्थी एसएससी मंडळाचे आहेत. त्यापाठोपाठ आयसीएसई ५ हजार २४४ विद्यार्थी आहेत. तर सीबीएसईचे २ हजार ८२४ विद्यार्थी आहेत. मुंबईत अकरावीला प्रवेश घेण्यासाठी सुमारे ४ हजार ६६ इतक्या बाहेरच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच मुंबई एमएमआर सोडून राहणार्‍यांनी अर्ज केले आहेत. याचा अर्थ गेल्या वर्षी पेक्षा यंदा बाहेरच्या विद्यार्थ्यांनी कमी पसंती दर्शवली आहे.

 

अकरावीची पहिली यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा

 

३० हजार जागांची भर

इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातून शिल्लक राहिलेल्या सुमारे ३0 हजार ८३७ जागांची भर पहिल्या फेरीत झाली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना या जागांचा मोठा दिलासा मिळाला.

दुसरी यादी ४ जुलैला

पहिल्या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या यादीची वाट पाहावी लागणार आहे. नव्वदीच्या वर तसेच आसपास असणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश उद्या यादीत लागण्याची शक्यता आहे.