पाहा शेअर बाजारातील घडामोडी

आज मुंबई शेअरबाजार १७ हजार ४५५ सेन्सेक्सवर खुला झाला. त्यात ५४ अंशांची घट झाली आहे. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार ३१२ अंशांवर खुला झाला. निफ्टीमध्येही १९ अंशांची घट होताना दिसते आहे.

Updated: Apr 20, 2012, 11:30 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज मुंबई शेअरबाजार १७ हजार ४५५ सेन्सेक्सवर खुला झाला. त्यात ५४ अंशांची घट झाली आहे. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार ३१२ अंशांवर खुला झाला. निफ्टीमध्येही १९ अंशांची घट होताना दिसते आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया आज  ५१ पूर्णांक १६ अंशावर उघडला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या किंमतीत शून्य पूर्णांक शून्य पंचवीस अंशांनी घसरण झालेली दिसते.

 

तर काल मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स १७ हजार ५०३ अंशांवर बंद झाला. त्यात १११ अंशाची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी काल ५ हजार ३३२ अंशांवर बंद झाला. त्यात ३२ अंशांची वाढ झाली. काल सकाळी बाजार वरच्या पातळीवर उघडला होता. सकाळच्या सत्रात बाजार संथ गतीनं वाढ झाली.  दुपारच्या सत्रात बाजारानं १७ हजार ५०० ची उच्चांकी पातळी गाठली.

 

मात्र, त्यानंतर रिलायन्सचे स्टॉक्स घसरल्यामुळे बाजारात घट पहायला मिळाली. शेवटी बाजार काल तुलनेनं वरच्या पातळीवर बंद झाला. काल कोल इंडिया, एचडीएफसी, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे शेअर्स वधारलेत तर भेल, हिंडाल्को, गेल, विप्रो, आणि रिलायन्स या कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.