पोलिसांना चकवा दिलेला विजय पालांडे अटकेत

ओशिवरा अरुण टिक्कू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विजय पालांडे हा फरार झाला काल फरार झाला होता. विशेष म्हणजे त्यांने क्राईम ब्रांच पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. या प्रमुख आरोपीला पुन्हा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणी ३ आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.

Updated: Apr 11, 2012, 08:24 AM IST

www.24taas.com, मुंबई

ओशिवरा अरुण टिक्कू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी  विजय पालांडे हा फरार झाला काल फरार झाला होता. विशेष म्हणजे त्यांने क्राईम ब्रांच पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. या प्रमुख आरोपीला पुन्हा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणी ३ आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.

ओशिवरातले जेष्ठ नागरिक अरूण टिक्कू  हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अखेर गजाआड झालेहोते. कोट्यावधी किंमतीचे फ्लॅट मिळवण्यासाठी आरोपींनी टिक्कू यांची हत्या केली होती. क्राइम ब्रांचने ३ आरोपींना कऱ्हाड आणि मुंबईतून अटक केले होते. मात्र, काल विजय पालांडेने पोलिसांना चकवा देत पळ काढला. त्यालापोलिसांना अंधेरी येथे रात्रीच अटक केली. त्यामुळे पोलिसांची वेशीवर टांगलेली अब्रु वाचली आहे.

७ एप्रिल २०१२ला मुंबईच्या ओशीवारा परिसरात अरूण टिक्कू या जेष्ठ नागरिकाची निर्घूण हत्या करण्यात आली होती. तब्बल तीन दिवसांचा तपासानंतर मुंबई पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी विजय पलांडे, धनंजय शिंदे आणि मनोज गजकोष या तिघांना अटक केली होती. त्यात विजय पलांडे हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पुन्हा त्यांने चकवा दिल्याने पोलिसांनी खबरदारी घेणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.