'बेस्टचा' आधार 'बेस्ट'

मुंबई पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे आज चांगलेच हाल झाले. या जम्बो ब्लॉकचा परिणाम बेस्ट वाहतुकीवरही झाला. लोकल बंद असल्याने मुंबईकरांनी दुसरी लाइफलाईन बेस्टचा आधार घेतला. मात्र वाहतुकीचा सारा ताण बेस्ट बसवर आल्याने प्रवाशांची गर्दी पाहायला आज मिळाली.

Updated: Feb 5, 2012, 05:44 PM IST

www.24taas.com , मुंबई 

मुंबई पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे आज चांगलेच हाल झाले. या जम्बो ब्लॉकचा परिणाम बेस्ट वाहतुकीवरही झाला. लोकल बंद असल्याने मुंबईकरांनी दुसरी लाइफलाईन बेस्टचा आधार घेतला. मात्र वाहतुकीचा सारा ताण बेस्ट बसवर आल्याने प्रवाशांची गर्दी पाहायला आज मिळाली.

जम्बोब्लॉकचा मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने जवळपास ८० अतिरिक्त बेस्ट बस चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र दिवसाला सुमारे १००० लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ताण बेस्टवर पडल्याने लटकून प्रवास करण्याऐवजी दुसरा कोणताच पर्याय मुंबईकरांकडे नव्हता.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकरांनी नातेवाईकांच्या भेटीचे कार्यक्रम आखले होते. मात्र पश्चिम रेल्वेच्या जम्बोब्लॉक त्यांच्यासाठी त्रासदायक ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबईकरांना बेस्ट बसचा आधार घ्यावा लागला.