'मंकी मॅन'च्या अफवेने केलाय कहर

मुंबईत मंकी मॅनच्या अफवेमुळं नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या अफवेमुळं नागरिकांची झोप उडाली आहे. पोलिसांनी मात्र या अफवेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.

Updated: Mar 1, 2012, 11:39 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत मंकी मॅनच्या अफवेमुळं नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या अफवेमुळं नागरिकांची झोप उडाली आहे. पोलिसांनी मात्र या अफवेवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. या मंकी मॅनच्या अफवेमुळे मुंबईकरांना जागता पाहारा द्यावा लागतो आहे. मुंबईच्या उपनगरात या मंकी मॅनच्या अफेवेचे पेव फुटले आहे. परंतु यामुळे लहान मुलं आणि महिला यांच्यात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.

 

या अफवेमुळे उपनगरवासीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली असल्याने अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांनी दिले आहेत. या मंकी मॅनची पहिली अफवा भांडुप आणि घाटकोपर परिसरात पसरली. मात्र येथे अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केल्यानंतर हा प्रकार बंद झाला. त्यानंतर अंधेरी भागात ह्या 'मंकी मॅन'ची अफवा पसरली. तर आता हीच अफवा कांदीवली आणि मालाड भागातही पसरली आहे.

 

पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे की, ही एक अफवा आहे नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अफवेमुळेच अनेकांचे फावते त्यामुळे नागरीकांना भिऊन न जाता सर्तक राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.