'मटा'च्या कार्यालयात शिवसैनिकांची तोडफोड

महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली.

Updated: Jan 28, 2012, 05:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली. दरम्यान तोडफोड प्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जवळपास दोनशे ते अडीचशे शिवसैनिकांनी मटाच्या ऑफिसमध्ये आज सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये घुसले आणि तिथे मोठ्याप्रमाणात धिंगाणा घालत तोडफोड केली. महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक सारंग दर्शने यांनी या तोडफोडीचा निषेध केला आहे. तर याप्रकरणी १६ जणांवर एफआयआर दाखल केले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सहआयुक्त रजनीश सेठ यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केलीए. महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.

 

काय दिलं होतं ‘मटा’ने वृत्त

राष्ट्रवादीच्या गळाला लागलेले खासदार म्हणजे शिवसेनेचे अमरावती येथील खासदार आणि को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ हेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पिचड यांनी घोषणा करताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे खासदार बळीराम जाधव यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, भावना गवळी, अनंत गीते, गणेश दुधगावकर यांच्या कडे बोटे उठली. मात्र, ही शक्यताही फोल ठरली. अखेर अडसूळ यांचेच नाव पुढे आले. अलीकडेच शिवसेनाप्रमुखांनी मातोश्रीमध्ये बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीस थाकुरमातूर कारण देऊन अडसूळ गैरहजर राहिलेहोते. दरम्यान, ‘पक्षाचा अध्यक्ष’ या पिचड यांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळे तर्कवितर्कांना उधाण आले असून, पिचड यांना खरोखरच ‘पक्षाचा अध्यक्ष’ अभिप्रेत आहे की ‘पक्षाच्या छत्राखालील संघटनेचा अध्यक्ष’ ? याचा काथ्याकुट दिवसभर सुरू होता.