झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबईत लोकलचा प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊनच करावा लागतो. दिवसेंदिवस रेल्वेमध्ये प्रवाशांची वाढती संख्या, यामुळे लोकल ट्रेनवर फार मोठ्या प्रमाणात भार पडतो यासाठी मध्य रेल्वेने आजपासून सगळ्या लोकल ट्रेन या बारा डब्यांच्या केल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना थोडा का होईना पण सुखकर प्रवास करता येईल
मध्य रेल्वेच्या सगळ्या लोकल गाड्या आजपासून बारा डब्यांच्या होणार आहेत. मंगळवारपर्यंत ९ डबे असलेल्या लोकलच्या ५६ फेऱ्या सुरु होत्या. आता या ९ डब्यांच्या लोकल गाड्यांचं परिवर्तन १२ डब्यांमध्ये करण्यात आलं. यामुळे आजपासून मध्य रेल्वेवर सर्वच्या सर्व म्हणजे ७८५ लोकलच्या फेऱ्या आता १२ डब्यांच्या होतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासी वाहून नेण्याच्या लोकलच्या क्षमतेमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. जीवघेण्या लोकल प्रवासामध्ये प्रवाशांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे.