मुंबईत आता रेल्वेला एलिव्हेटेड कॉरि़डोर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवरची वाढती गर्दी लक्षात घेता सीएसटी ते कल्याण आणि सीएसटी ते पनवेल असा इलेव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे.

Updated: Jan 26, 2012, 09:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवरची वाढती गर्दी लक्षात घेता सीएसटी ते कल्याण आणि सीएसटी ते पनवेल असा इलेव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे.

यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी दिली आहे. सीएसटी ते पनवेल दरम्यान प्रस्तावित असलेला एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पनवेलच्या नवीन एअरपोर्टला जोडण्यात येणार आहे.

त्यामुळे रेल्वेच्या फेऱ्याही वाढणार आहेत. त्याचबरोबर प्रवासी क्षमताही वाढणार आहे.

[jwplayer mediaid="36269"]