www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या मोनोरेलची चाचणी यशस्वी झाली आहे. वडाळा डेपो ते वडाळा आयमॅक्स मार्गावर चाचणी घेण्यात आली. सुमारे दोन किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर मोनोरेलची चाचणी घेण्यात आली.यावेळी रेल्वेचे वरीष्ठ तंत्रज्ञ उपस्थित होते.
चार डब्ब्यांची हिरव्या रंगाची मोनोरेल धावता पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मोनोरेलचा पहिला मार्ग चेंबुर ते वडाळा वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वडाळा ते जेकअप सर्कल हा मार्गही पुढच्या वर्षी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यादृष्टीनं मोनोरेलची आजची चाचणी महत्वाची होती.
मोनोरेल हे तंत्रज्ञान देशात पहिल्यांदाच वापरलं जाणार आहे. मुंबईत नियमित प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मेट्रो रेल्वे आणि मोनोरेलची प्रतिक्षा आहे.